Eat That Frog Book in Marathi PDF Free Download

Eat That Frog Book in Marathi PDF Free Download , Eat That Frog Book Summary in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे Marathibookspdf.com साईट वरती सहर्ष स्वागत आहे. मिञांनो जर तुम्ही Eat That Frog Marathi PDF Free Download करणार असाल की किंवा या पुस्तकाची मराठी समरी वाचणार असाल तर तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आला आहात.

Eat That Frog Book in Marathi PDF Free Download

मिञांनो जर तुम्ही या आर्टिकल ला शेवटी पर्यंत वाचले तर तुम्हाला Eat that frog book summary in marathi मध्ये वाचण्यासोबतच या पुस्तकाची मराठी pdf सुद्धा फ्री मध्ये download करण्यासाठी मिळेल. म्हणून मित्रानो या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा.

Eat That Frog Book in Marathi PDF Free Download , Eat That Frog Book Summary in Marathi
Eat That Frog Book in Marathi PDF Free Download , Eat That Frog Book Summary in Marathi

Eat That Frog Book Summary in Marathi

मिञांनो दररोज आपल्याकडे कामांची लांबलचक यादी नेहमीच तयार असते आणि त्यातील सगळ्याच गोष्टी पार पाडण्यासाठी आवश्यक तो वेळ आपल्यापाशी कधीच उपलब्ध नसतो, अर्थातच पुढेही तो कधीच नसेल.

मिञांनो यशस्वी लोक सगळ्याच कामांचा फडशा पाडत नाहीत, तर ते अत्यंत महत्त्वाच्याच कामांवर लक्ष केंद्रित करत ती तत्परतेनं ते काम पूर्ण करतात. आणि आपल्या महत्वाच्या कामांवर ते अक्षरशः तुटून पडतात.

Eat That Frog ही एक जुनी आणि प्रसिद्ध अशी पाश्चिमात्य म्हण आहे . लेखक ब्रायन ट्रेसी यांनी आपल्या समोर असणान्या आव्हानात्मक कामांसाठी फ्रांग ( बेडूक ) हे रूपक वापरलं आहे .

मिञांनो आपल्याला कळायच्या आतच बेडूक जसा टुणकन उडी मारून निघून जातो, तसेच वेळही तितक्याच सहजतेनं निसटत असतो. Eat That Frog चा अर्थ असा आहे की’ वेळ हातातून निसटून जाण्याआधीच आव्हानात्मक आणि कठीण कामास पूर्ण करा.

या म्हणीनुसार पूर्वापार असं म्हटलं जातं की , आपण रोज सकाळी उठल्यावर एक जिवंत बेडूक खायला हवा म्हणजे काय तर अवघड , नावडतं काम अगोदर पूर्ण करायला हवं , त्यामुळे अत्यंत रटाळ आणि नावडतं काम संपवल्याचं समाधान तुम्हाला मिळेल.

त्यानंतरचा सगळा वेळ , दिवस तुमच्या आवडत्या कामासाठी तुम्हाला मोकळा मिळेल ! वेळेचं प्रभावी नियोजन कसं करायचं आणि त्याच्या आधारे दररोज आपल्या पुढ्यातील महत्त्वाची कामं , आव्हान कार्यक्षमतेनं कशी पार पाडायची याचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे.

मित्रानो या पुस्तकात लेखक ब्रायन ट्रेसी यांनी कमीत कमी वेळेत अधिकाधिक काम करण्यासाठी 21 प्रभावी मार्ग सांगितले आहेत, पण मित्रानो आज च्या ह्या आर्टिकल माध्यमातून मी आज तुमच्या सोबत त्यातील काही महत्वाचे 7 मार्ग तुमच्या सोबत शेअर करणार आहे, चला तर मग जाणून घेऊया.

1. आखणी करा.

मित्रानो या पहिल्या अध्यायात लेखक ब्रायन ट्रेसी असे सांगतात की आपल्या पुढ्यातील महत्वाचं काम कोणतं आहे, ते ठरवून घेण्याआधीच आयुष्याकडून आपल्याला नक्की काय हवंय याची सुस्पष्टता येणं हे अति महत्वाचे आहे.

म्हणजेच मित्रानो आपल्याला नक्की काय हवं आहे, आपण नक्की काय करतोय आणि कशासाठी करतोय या बाबत स्पष्टता असणे खूप गरजेचे आसते. आणि यश मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मनातील विचार कागदावर उतरवणे.

जगातील केवळ तीन टक्के लोकच आपली उद्दिष्ट कागदावर सुस्पष्टपणे उतरवतात. यांच्याइतकंच शिक्षण , अनुभव आणि क्षमता असूनही इतर लोक मात्र तुलनेन पाच ते दहा टक्के कमी कामगिरी करून दाखवतात, कारण त्यांनी आपली उद्दिष्टं कागदावर लिहिलेली नसतात.

मित्रानो आपली उद्दिष्टं निश्चित करून ती साध्य करण्याचा एक शक्तिशाली फॉर्म्युला आहे. त्यामध्ये फक्त सात पायऱ्या समाविष्ट आहेत . यांपैकी कोणतीही पायरी तुमची उत्पादकता दुपटीन किंवा तिपटीनं वाढवू शकते .

या सोप्या सात पायऱ्यांचा अवलंब करून लेखकांच्या कित्येक मित्रांनी त्यांचे उत्पन्न अवघ्या काही वर्षांमध्ये आश्चर्यकारकरीत्या वाढवलं आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया त्या 7 पायाऱ्यांबद्दल.

1. तुम्हाला नक्की काय हवंय ते ठरवा .

मिञांनो तुम्हाला नक्की काय हवंय हे ते आधी तुम्ही स्वतः ठरवा आणि ते अगदी स्पष्टपणे जाणून घ्या आणि लिहून काढा.  मिञांनो जे काम करण्याची मुळीच गरज नसते, तेच उत्तमरीत्या करणं , हा वेळेचा सर्वांत मोठा अपव्यय आहे .

स्टीफन कवी असे म्हणतात की , जर शिडी योग्य भिंतीवर टेकवलेली नसेल , तर त्या शिडीची तुम्ही चढत असलेली प्रत्येक पायरी तुम्हाला चुकीच्या ठिकाणीच घेऊन जाते , तेही अगदी वेगानं! म्हणुन मित्रानो तुम्हाला नक्की काय हवंय ते आधी ठरवा.

2. लिहून काढा .

मित्रानो फक्त मनातल्या मनात विचार न करता ते विचार अथवा उद्दिष्ट कागदावर लिहून काढा कारण कागदावर उतरवल्यानंतरच ध्येयांना मूर्त स्वरूप प्राप्त होतं आणि त्यानंतर ती प्रत्यक्ष पाहण्याची वाचण्याची, स्पर्श करण्याची जादू तुम्ही अनुभवता.

दुसरीकडे जी उद्दिष्ट कागदावर उतरत नाहीत, ती उदिष्ट फक्त स्वप्नं किंवा कल्पनाविलास बनून राहतात. कारण त्यामाग कोणताही प्रेरणास्रोत नसतो. कागदावर लिहून न काढलेली उद्दिष्ट ही अनिश्चित , संदिग्ध , दिशाभूल करणारी आणि असंख्य चुकांनीच भरलेली असतात.

3. उद्दिष्टपूर्तीची कालमर्यादा निश्चित करा.

मित्रानो आपल्या उद्दिष्टपूर्तीची कालमर्यादा निश्चित करा आणि जर गरज भासल्यास उपमर्यादादेखील ठरवा. कार्यपूर्तीची डेडलाइन निश्चित नसेल , तर त्या उद्दिष्टाला गांभीर्य राहत नाही . त्याला खऱ्या अर्थाने सुरुवात आणि शेवट असं काही उरतच नाही.

आपल्या पुढ्यातील काम किंवा उद्दिष्ट विशिष्ट कालमर्यादिच्या चौकटीत बसवलं नाही , तर त्या कामाच्या बाबतीत आपल्याकडून आपसूकच चालढकल – दिरंगाई होत राहते. म्हणून तिसरी पायरी अशी आहे की आपल्या उद्दिष्टपूर्तीची कालमर्यादा निश्चित करा.

4. ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीची यादी बनवा.

मिञांनो नवीन विचार आणि कार्यपद्धती जसजशा मनात येतील , तस तश्या त्यांचा यादीत समावेश करत जा आणि यादी परिपूर्ण होईपर्यंत लिहीत राहा. यादीमुळे ध्येयाचं विस्तृत चित्र डोळ्यासमोर उभं राहील. आणि यामुळे तुम्हाला नक्की कोणत्या मार्गाने जायचंय हे कळेल.

मित्रानो असं केल्यानं आपण ठरवलेलं ध्येय आणि त्यासाठी निश्चित केलेला वेळ याचं समीकरण साधण्याची , ते अगदी तसंच पूर्णत्वास जाण्याची शक्यता आश्चर्यकारक पणे वाढते. म्हणून मित्रानो चौथी पायरी अशी आहे की ध्येयप्राप्ती साठी आवश्यक वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीची यादी बनवा.

5. यादीचं रूपांतर योजनेत करा.

मिञांनो आपला प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार सूचिबद्ध यादी बनवा . सर्व कामं ज्या क्रमानं आणि पद्धतीनं होणं अपेक्षित आहेत , तशी लिहून काढा. त्यानंतरच यादीचं रूपांतर योजनेमध्ये होईल. सर्वप्रथम काय करायचंय आणि नंतर काय केलं तरी चालेल याचा मिनिटभर शांत बसून विचार करा.

तुमच्या योजनेला अधिक स्पष्टता देण्यासाठी योजनाही रेखाटन, आराखडा , ठोकळे आणि वर्तुळ यांच्या स्वरूपात कागदावर उतरवा. केवळ मनामध्येच उद्दिष्ट बाळगणाऱ्या लोकांच्या तुलनेत लेखी आणि कागदावरील सुसूत्र योजनेमुळे तुम्ही कित्येक पटींनी जास्त उत्पादक आणि यशस्वी व्हाल.

6. आपल्या योजनेनुसार तत्काळ कृती करा .

मिञांनो आपल्या लिखित उद्दिष्टाला थोडंफार का होईना ; पण तुमच्या कृतीच्या दिशेनं वळवा. कागदावरच पडून राहणाऱ्या जबरदस्त कल्पक योजनेपेक्षा कार्यवाही सुरू झालेली सर्वसाधारण योजना देखील कित्येक चांगली असते.

कुठल्याही प्रकारचं यश मिळवण्यासाठी प्रत्यक्ष कृती हेच सर्वकाही आहे. म्हणून मित्रानो सहावी पायरी अशी आहे की आपल्या योजनेनुसार तत्काळ कृती करा.

7. योजनेचं रूपांतर दैनंदिनीत होईल , असं बघा.

मिञांनो ध्येयाच्या दिशेनं घेऊन जाईल , असं काही तरी दररोज करण्याचा संकल्प सोडा, त्या ऐवजी योजनेचं रूपांतर दैनंदिनीत होईल , असं बघा.  जसं एखाद्या विषयावरील ठरावीक पानं रोज वाचायचीच असं ठरवा.

अमुक इतक्या ग्राहकांना रोज फोन करून संपर्क साधायचाच असं ठरवा . रोज ठरावीक वेळ विशिष्ट प्रकारचा व्यायाम करायचाच असं ठरवा. परकीय भाषेतील ठरावीक शब्द रोज शिकायचेच असं ठरवा .

तुम्हाला जे काही करण्याची इच्छा आहे ते नियमितपणे – एका दिवसाचाही खंड पडू न देता करत राहा आणि स्वतःला पुढे सरकवत राहा . पुढे जायला एकदा का सुरुवात केली की , वाटचाल करतच राहा . हा निर्णय , ही शिस्तच तुमच्या उद्दिष्टपूर्तीचा वेग आणि वैयक्तिक उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढवेल .

मिञांनो कागदावर स्पष्टपणे लिहिलेली उद्दिष्टं तुमच्या विचारांवर जबरदस्त प्रभाव टाकतात आणि तुम्हाला कार्यप्रवृत्त करतात. कल्पकतेला वाव देतात , तुमच्यातील ऊर्जेला मुक्त करतात आणि दिरंगाई दूर करण्यासाठी साहाय्यक ठरतात.

मित्रानो कार्यपूर्तीसाठी लेखी उद्दिष्ट हे सर्वोत्तम इंधन असतं. तुमचं ध्येय जितकं मोठं , सुस्पष्ट तितकंच ते साध्य करण्यासाठीची तुमची उत्सुकताही अधिक ! ध्येयप्राप्तीचा अधिकाधिक केला जाणारा विचारच तुमची आंतरिक इच्छा बनत जाते आणि ते प्राप्त करणं हा तुमचा ध्यास बनतो.

2. प्रत्येक दिवसाचे पूर्वनियोजन करा.

मिञांनो लेखक ब्रायन ट्रेसी या अध्यायात असे म्हणतात की रोज रात्री झोपण्या आधी तुम्हाला तुमच्या दुसऱ्या दिवसाची यादी तयार करायची आहे. आज च्या दिवशी तुमची जी जी कामे अपूर्ण राहिली आहेत, त्या कामांना सुद्धा दुसऱ्या दिवसाच्या कामाच्या यादी मध्ये समावेश करा.

रात्री झोपण्या आधी जर तुम्ही तुमची ही यादी लिहून काढली तर तुमच्या अवचेतन मनावर ती आपोआप कोरली जाईल. आणि त्या नंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा नवीन कल्पना स्फुरून उठाल.

या कल्पना तुम्हाला तुमच्या संपूर्ण दिवसाची काम वेगानं आणि आधिक चांगल्या प्रकारे हातावेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतील. दुसऱ्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी तुम्ही आधीच जितका वेळ खर्च कराल ठेवढे जास्त तुम्ही दुसऱ्या दिवशी कार्यक्षम आणि प्रभावी बनाल.

यादी मधील जस जशी काम सातत्याने मार्गी लागत जातील, तसतसे तुमच्यातील सकारात्मकता , उत्साह वाढेल. आणि तुम्ही चाल ढकल कार्यापासून आपसूकच दूर राहाल. आणि दिवसभर तुम्ही न थांबता व न कंटाळता उत्साहानं काम कराल.

90/10 नियम लागू करा.

मित्रानो वैयक्तिक प्रभावीपनाचा एक सर्वात महत्वाचा नियम म्हणजे 10/90 चा नियम . हा नियम अस सांगतो की कामाचं पूर्वनियोजन करण्यासाठी तुम्ही दिलेला 10% वेळ हा ते काम पूर्ण झाल्यानंतर ते यशस्वीपने पार पाडण्यासाठी लागणारा 90% वेळ वाचवणारा ठरतो.

मित्रानो जर तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवणार असाल तर तुम्ही एकदा तरी 90/10 या नियमानुसार वागून बघाच. हा नियम तुमचे आयुष बदलवू शकतो.

3. सगळ्या गोष्टींना 80/20 नियम लावा.

वेळेचं आणि आयुष्याचं व्यवस्थापन करताना ८० / २० चा नियम हा हरप्रकारे उपयुक्त ठरतो. इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो प्यारेटो याने १८९५ मध्ये सर्वप्रथम ही ८० / २० ची संकल्पना मांडली, त्यामुळे हा ‘ प्यारेटोचा नियम ‘ म्हणूनही ओळखला जातो.

प्यारेटो याच्या असं लक्षात आलं की, या समाजातील लोक अभिजन आणि बहुजन अशा दोन गटांत विभागलेले आहेत. यांपैकी ‘अभिजन‘ हे मोजके २० टक्के असून , त्यांच्याकडे सर्वाधिक सत्ता , पैसा , संपत्ती एकवटलेली आहे ; तर ‘बहुजन‘ हे मुबलक ८० टक्के असून ते तळागाळातील जीवन जगत आहेत.

कालांतरानं त्याच्या असंही लक्षात आलं की, अर्थशास्त्रातील जवळपास सर्व घटकांना हेच सूत्र लागू पडतं. उदाहरणार्थ हे सूत्र असं सांगतं की तुमच्या २० टक्के कामगिरीचा प्रभाव हा ८० टक्के परिणामावर पडतो किंवा तुमचे २० टक्के ग्राहक मिळून तुमची ८० टक्के विक्री साध्य करतात.

तुमची २० टक्के उत्पादनं किंवा सेवा या तुम्हाला ८० टक्के नफा मिळवून देत असतात ; तुमच्या २० टक्के कामगिरी वरून तुमचं ८० टक्के मूल्य करत आसते. याचा अर्थ जर तुमच्यापाशी दहा कामांची यादी असेल , तर त्यापैकी दोन काम एवढी महत्त्वाची असतात की बाकी ची आठ काम त्यापुढे फिकी ठरतात.

मित्रांनो मी तुम्हाला एका रंजक शोधाविषयी सांगतो. दहा काम आहेत आणि ते प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळही एकसमान आहे. तरी देखील एक किंवा दोन कामंच पाच – दहा कामांच्या तोडीची किंबहुना अधिक मोलाची ठरतात .

अनेकदा , बाकीची नऊ काम एका पारड्यात ठेवली , तर त्या तुलनेत दुसऱ्या पारड्यातलं एकच काम भारी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं , हे काम म्हणजेच असं कठीण काम जे सर्वात प्रथम हातावेगळं करायचं आहे ! याचाच अर्थ ‘ तो बेडूक ‘ ज्याचा तुम्हाला फडशा पाडायचा आहे !

कोणत्या कामाच्या वेळी मनुष्य जास्तीत जास्त चालढकल करतो, हे तुम्हाला माहिती आहे का ? खेदाची बाब ही आहे , की बहुसंख्य लोक सर्वाधिक महत्त्वाची १०/२० टक्के ‘ अभिजन ‘ म्हणजेच अतिमहत्त्वाची कामं करतानाच दिरंगाई दाखवतात आणि कमी महत्त्वाच्या ८० टक्के ‘ बहुजन ‘ कामांमध्येच ते स्वतःचा वेळ तसंच शक्ती जास्त खर्च करतात.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही लोक दिवसभर अखंडपणे काम करूनही दिवसाच्या शेवटी त्यांचे खूपच कमी काम पूर्ण झालेलं असतं. याचं एकमेव कारण म्हणजे ते लोक कमी महत्त्वाच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतात.

ज्या कामांमुळे लक्षणीय परिणाम प्राप्त होणार असतो, अशा एक – दोन अतिशय महत्त्वाच्या कामांना ते पुढे पुढे ढकलत राहतात. त्यांनी ही कामं प्राधान्याने पार पाडली, तर निश्चितच त्यांच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत कारकिर्दी मध्ये ही खूप मोठा फरक पडेल.

तुम्ही हातात घेत असलेली एकमेव महत्त्वाची कामगिरी सर्वोत अवघड आणि किचकट असू शकते ; पण ती पूर्ण केल्यामुळे मिळणारं यश हे नेत्रदीपक असेल यात शंका नाही. यामुळेच अत्यंत महत्त्वाची वरच्या पातळीची २० टक्के काम शिल्लक असताना तुम्ही त्याखालची तळातील ८० टक्के कामं कटाक्षानं दूर ठेवायलाच हवीत.

कोणत्याही कामाला सुरुवात करण्याआधी नेहमी स्वतःला विचारा , हे काम वाच्या २० टक्क्यांपैकी आहे की खालच्या ८० टक्क्यां पैकी १. मित्रांनो हे कायम लक्षात ठेवा की तुम्ही जे करता आणि जशा पद्धतीनं करता ते कालांतरानं तीच तुमची अंगभूत सवय बनते आणि मग तिच्या पासून सुटका करून घेणं अवघड होतं.

आज जर तुम्ही सटरफटर कामांपासून दिवसाची सुरुवात केली , तर पुढे नेहमीच कमी महत्त्वाच्या कामामध्ये तुम्ही गुंतून पडाल. अर्थातच ही सवय तुम्हाला लावून घायची नाहीये हे नक्की ! कमी महत्त्वाची कामं सशाच्या पिल्लां सारखी असतात, ती सतत वाढत राहतात.

तुम्ही त्यांची वीण थांबवू शकत नाही, पण महत्त्वाच्या कामाबाबत सर्वांत अवघड बाब म्हणजे ते काम लगेच सुरू करणं . एकदा का तुम्ही ते करायला घेतलं की , ते पुढे नेण्यासाठी आपोआप प्रेरणा मिळते. मग कामात जसजसं यश मिळत जातं तसतसं ते काम तुम्हाला मनापासून आवडू लागतं.

मिञांनो यासाठी तुमच्या मनाच्या या भागाला तुम्ही सातत्यानं खाद्य पुरवत राहायचंय , इतकंच ! स्वतःला प्रेरित करा महत्त्वाचं काम सुरू करून वेळेत पूर्ण करण्याचा नुसता विचार सुद्धा तुम्हाला पुरेशी प्रेरणा देऊन जातो आणि दिरंगाई टाळण्यास साहाय्यभूत ठरतो.

4. ABCD पद्धतीचा सत्यात्याने वापर करा.

मिञांनो एबीसीडी पद्धत’ हे अग्रक्रम निश्चित करण्याचं एक प्रभावी तंत्र आहे, ज्याचा उपयोग तुम्ही अगदी दररोज करू शकता. हे तंत्र एवढं सोपं आणि परिणामकारक आहे की, त्याच्या साहाय्यानं तुम्ही स्वतःच्या क्षेत्रातील सर्वाधिक कार्यक्षम आणि प्रभावी व्यक्ती बनू शकता.

या तंत्राच्या सोपेपणातच त्याची शक्ती दडलेली आहे. हे तंत्र नक्की कसं काम करतं ते पाहू या : आज जे काही करायचं आहे त्याची एक यादी लिहून काढा. मनातले विचार कागदावर उतरवा. त्यानंतर लिहिलेल्या प्रत्येक कामापुढे एबीसीडी अशी नोंद करा.

आता यादीतील ‘ए’ अशी नोंद असलेलं काम म्हणजे सर्वाधिक महत्त्वाचं, जे कुठल्याही परिस्थितीत आज तुम्ही पार पाडायचंच आहे. हे काम असं आहे की, जे तुम्ही पूर्ण केलं किंवा करू शकला नाहीत, तर त्याचा गंभीर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम तुमच्या वाट्याला येणार आहे.

जसं, महत्त्वाच्या ग्राहकाला भेटायला जाणं किंवा पुढच्या बोर्ड मीटिंगच्या आधी बॉसला आवश्यक असलेला अहवाल लिहून देणं इत्यादी. हे काम म्हणजे तुमच्या वाट्याला आलेला सर्वांत मोठा आणि कुरूप बेडूक आहे, तेव्हा सगळ्यात आधी त्याचा फडशा पाडा.

जर तुमच्या पुढे एकापेक्षा जास्त कामं असतील, तर त्यांची उप-वर्गवारी तुम्ही ए-१, ए-२, ए-३ अशीही करू शकता. ‘बी’ वर्गवारीतील काम म्हणजे जे तुम्ही करायला हवं आहे असं काम; पण त्याचे परिणाम तुलनेने सौम्य असतात. अशा प्रकारची कामं म्हणजे तुमच्या जीवनातील बेटकुळ्या म्हणजेच तुलनेनं कमी महत्त्वाची कामं असतात.

याचा अर्थ जर तुम्ही या कामांपैकी एखादं काम नाही करू शकला, तर कोणीतरी नाराज होण्याची किंवा कोणाची तरी गैरसोय होण्याची शक्यता असते; पण हे काम ‘ए’ श्रेणीतील करायला‘च’ हवं अशा प्रकारचं नसतं. मोबाईलवर आलेल्या एखाद्या बिन महत्त्वाच्या संदेशाला उत्तर देणं किंवा ई-मेलला प्रतिसाद देणं इत्यादीचा ‘बी’ श्रेणीमध्ये समावेश होतो.

इथे नियम असा आहे की, ‘ए’ श्रेणीतील काम शिल्लक राहिलेलं असताना तुम्ही ‘बी’ श्रेणीतील कामाला हात घालता कामा नये. तुमच्या पुढ्यात मोठा बेडूक हजर असताना तुम्ही छोट्या बेटकुळी कडे लक्ष द्यायचं कारणच नाही.

‘सी’ श्रेणीतील काम म्हणजे असं काम जे करायला चांगलं असतं; पण ते केलं किंवा नाही केलं तरी त्यामुळे कोणताही फरक पडत नाही. मित्राला फोन करणं, सहकाऱ्यासोबत कॉफी किंवा जेवण घेणं, कार्यालयीन वेळेत काही किरकोळ वैयक्तिक कामं करणं इत्यादींचा समावेश या वर्गवारीमध्ये होतो.

अशा प्रकारच्या कामांचा तुमच्या व्यावसायिक जीवनावर कोणताही भलाबुरा परिणाम होत नसतो. ‘डी’ श्रेणीतील कामं अशी असतात, जी तुम्ही दुसऱ्यांना करायला सांगू शकता. इथं नियम असा आहे की, दुसरी व्यक्ती सहज करू शकेल, असं प्रत्येक काम तुम्ही त्या व्यक्तीला द्यायलाच हवं.

तेव्हाच ‘ए’ श्रेणीतील काम करायला तुमच्याकडे पुरेसा जादा वेळ शिल्लक राहील. ‘ई’ श्रेणीतील काम असं असतं, जे तुम्ही अजिबात केलं नाही किंवा रद्द केलं तरी चालतं. त्याचा कोणताही परिणाम होत नाही.

एकेकाळी महत्त्वाची असणारी; पण कालानुरूप आता तुमच्याशी किंवा अन्य कोणाशीही संदर्भ न उरलेली कामं या वर्गवारीमध्ये येतात. बहुतेक वेळा ही कामं तुम्ही केवळ सवय किंवा आवड म्हणून करून टाकता; पण लक्षात ठेवा ‘ई’ श्रेणीतील काम करण्यासाठी तुम्ही घालवलेला प्रत्येक मिनिट ‘ए’ श्रेणीतील काम करण्यासाठी कमी पडणार असतो.

एकदा का तुम्ही आपल्या यादीतील कामांची एबीसीडी अशी वर्गवारी केली की, मग पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी व्यवस्थितपणे आणि वेगानं पार पडतात. जर ही एबीसीडी कार्यपद्धती यशस्वीपणे राबवायची असेल, तर एकाच गोष्टीची गरज आहे.

आणि ती म्हणजे तुमच्या ए-१ श्रेणीतील कामाला लगेच सुरुवात करणं आणि ते पार पडेपर्यंत त्यात स्वतःला झोकून देणं. तुमची संपूर्ण इच्छाशक्ती पणाला लावून सर्वांत कठीण आणि महत्त्वाचं काम हाती घ्या. ते पूर्ण होईपर्यंत करतच राहा.

या बेडकाचा पूर्ण फडशा पाडा आणि तो संपेपर्यंत थांबू नका. वरच्या पातळीची कामगिरी करण्यासाठी, स्वप्रतिष्ठा उंचावण्यासाठी, स्वतःविषयीचा अभिमान जोपासण्यासाठी तुमची ए-१ श्रेणीतील कामं ओळखून ते अगोदर पार पाडण्यासाठी क्षमता उपयोगी पडते.

तुम्ही ए-१ श्रेणीतील कामांवर जेव्हा लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही तुमच्या सर्वांत महत्त्वाच्या कामाचा – सर्वांत मोठ्या बेडकाचा फडशा पाडता, तेव्हा तुमच्या आवतीभोवती असलेल्या लोकांपेक्षा अधिक काही तरी तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात होते.

5. 3 तीनचा नियम लागू करा.

मिञांनो या अध्यायात लेखक असे म्हणतात की कोणतेही काम करण्याआधी तीनचा नियम लागू करा. म्हणजेच मित्रानो तुम्हाला स्वतःला 1 प्रश्न विचारायचा आहे, आणि तो प्रश्न असा आहे की, 👇👇👇

तुम्ही स्वतःला विचारा की ‘जर मी पूर्ण दिवसात फक्त एकच काम करू शकणार असेन, तर ते कोणतं एक काम असलं पाहिजे ज्यामुळे मला सर्वोत्तम लाभ मिळेल?’ उत्तर मिळालं की, हाच प्रश्न आणखी दोन वेळा स्वतःला विचारा. एकदा का तीन मुख्य कामं लक्षात आली की, मग संपूर्ण झोकून देऊन ती पार पाडा.

6. सुरुवात करण्याआधी पुरेशी तयारी करा.

दिरगाई टाळण्याचा आणि कमी वेळात जास्त कामं पार पाडण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे पूर्वतयारी. पूर्वतयारी म्हणजे काम सुरू करण्या आधीच त्या कामाशी निगडित सर्व बाबींचा-गोष्टींचा विचार करून त्या हाताशी जमा करून ठेवणं.

मित्रानो अशी जेव्हा सगळी तयारी होईल, तुम्ही ट्रिगरवर बोट ठेवून रोखलेल्या बंदुकीसारखे किंवा प्रत्यंचा ताणलेल्या धनुष्यावरील बाणासारखे असाल. मग पुढच्या काळात आपण काय आणि किती साध्य केलं, हे पाहून तुम्हीच थक्क व्हाल.

7. एका वेळी एकच काम हातात घ्या.

एका वेळी एक पाऊल उचलून तुम्ही आयुष्यातील सगळी मोठी आणि महत्त्वाची कामं सुध्दा मार्गी लावू शकता. तुम्ही एवढंच करायचं की, आपली नजर जिथवर पोहोचते त्या टप्प्यापर्यंत जात राहायचं.

तिथं पोहोचलात की, पुढे कुठवर जायचं ते आपसूक दिसून येईल. मोठी कामगिरी पार पाडण्यासाठी पहिलं पाऊल उचलल्यानंतर आपलं पुढचं पाऊल काय असावं ते लवकरच समजेल ही श्रद्धा आणि संपूर्ण आत्मविश्वास तुमच्यापाशी असायला हवा.

एका वेळी एक काम हातात घ्यायचं, ते व्यवस्थित वेळेत पूर्ण करायचं आणि मग पुढच्या कामाकडे जायचं. या त्रिसूत्रीमुळे अतिशय उत्तम जीवनाचा आणि उत्कृष्ट कारकिर्दीचा लाभ घेता येतो.

जसे दरमहा थोड्या रकमेची बचत केल्यानं कालांतरानं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येतं. दररोज थोडं कमी खाल्ल्यानं आणि थोडा थोडा व्यायाम केल्यानं कालांतरानं तंदुरुस्ती आणि आरोग्य मिळवता येतं.

तसेच आपल्या ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी प्रत्यक्ष कृतीचं एक पाऊल उचला, कामाच्या ढिगातून योग्य ती निवड करून एकावेळी एकच ओझं उचला. तुमच्या या कृतीतून तुम्ही दिरंगाईवर मात करून खणखणीत कामगिरी करून दाखवू शकता.

मिञांनो ही होती Eat That Frog या पुस्तकाची मराठी समरी, मिञांनो तुम्हाला ही बुक समरी कशी वाटली? आणि या बुक समरी मधून तुम्हाला नवीन नवीन काय काय शिकायला मिळाले? हे आम्हाला खाली कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून जरूर कळवा.

मित्रानो जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर तुमच्या मित्र मैत्रीण सोबत अवश्य शेअर करा, आणि आमच्या सोबत जोडून राहण्यासाठी आमच्या knowledge Grow telegram channel ला नक्की subscribe करा.

Eat That Frog Marathi PDF Free Download

मित्रानो जर तुम्ही Eat That Frog Marathi PDF download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही Eat That Frog Marathi PDF Free download करू शकता.

Eat That Frog in Hindi PDF Free Download

मिञांनो जर तुम्ही Eat That Frog in Hindi PDF Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही Eat That Frog Hindi PDF Free Download करू शकता.

Releted Ebooks:

मिञांनो आज च्या ह्या Eat That Frog Book Summary in Marathi आर्टिकल मध्ये फक्तं एवढेच, मित्रानो आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग आर्टिकल सोबत, तो पर्यंत तुम्ही जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा.

धन्यवाद 🙏🙏🙏

Leave a Comment